दिल्लीत पार्किंग अपुरी पडल्याने रनवेवर 100 पेक्षा जास्त विमाने उभी


नवी दिल्ली/ मुंबई. शरद पांडेय/ विनोद


लॉकडाऊनमुळे देशात प्रवासी विमान सेवा बंद आहे. यामुळे विमानतळही अगदी शांत आहेत. रोज ७००हून अधिक विमानांची ये-जा असलेले दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पार्किंग स्थळ ठरले आहे. १९४ विमाने पार्किंगमध्ये उभी आहेत. २४ विमाने चक्क रनवेवर उभी आहेत. मुंबई विमानतळावर १००हून अधिक विमाने पार्क असून केवळ ४ ते १० कार्गो सुरू आहेत.


मुंबई विमानतळावर ३०% कर्मचारी मेंटेनन्समध्ये : मुंबई विमानतळावर एकूण कर्मचाऱ्यांपैकी सध्या ३० टक्के म्हणजे ४०० कर्मचारी कामावर येत आहेत. यातील बहुतांश मेंटेनन्स व स्वच्छतेची कामे करणारे आहेत. रन वेवरील लाइट व आयटी यंत्रणेकडे त्यांचे प्रामुख्याने लक्ष आहे.