आतापर्यंत 3 हजार 508 प्रकरणे; एका आठवड्यात तब्बल 2 हजार संक्रमित वाढले; दिल्लीत लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल 66 हजार लोकांविरूद्ध एफआयआर

नवी दिल्ली. देशात कोरोनाव्हायरसमुळे 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. मात्र असे असतानाही लोक यांचे उल्लंघन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी अशा 66 हजार लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर 10 हजार गाड्या जप्त केल्या आहेत. यातील 3350 गुन्हे भा.दं.वि कलम 188 नुसार दाखल झाले आहेत. पोलिसांनी होम क्वारंटाइनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 40 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


यादरम्यान शनिवारी देशभरात कोरोनाव्हायरस संक्रमणाचे 400 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील सर्वाधिक तमिळनाडू 27, दिल्ली 59, उत्तरप्रदेश 53, महाराष्ट्र 47, आंध्रप्रदेश 26, राजस्थान 21, हरियाणा 18, जम्मू-काश्मीर 17, कर्नाटक 16, केरळ 11, गुजरात 13, आणि पंजाबमध्ये 12 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. देशातील संक्रमितांची संख्या 3 हजार 508 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की गेल्या 24 तासांत 525 रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. एकूण संक्रमितांची संख्या 3 हजार 72 झाली आहे. यातील 213 बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोणत्या राज्यात किती नवे संक्रमित मिळाले...


शुक्रवारी तामिळनाडूमध्ये 102, दिल्लीमध्ये 93, तेलंगणामध्ये 75, महाराष्ट्रात 67, उत्तरप्रदेशात 44, राजस्थानमध्ये 35, मध्यप्रदेशात 34, आंध्रप्रदेशात 12, केरळमध्ये 9, हरियाणामध्ये 9, गुजरातमध्ये 7, जम्मू-कश्मीरमध्ये 5, कर्नाटकमध्ये 4 नवे रुग्ण मिळाले.