जम्मू. देशभरात 24 मार्चपासून 21 दिवसांसाठी लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे देशातील विविध भागांत अनेक कामगार अडकेल आहेत. अशात आपल्या घरी जाण्यासाठी लोक विचित्र युक्त्या वापरत आहेत. मात्र जम्मूच्या रुग्णालयातून 200 किलोमीटर दूर पुंछ येथे जाण्यासाठी 5 लोकांनी असेच काहीतरी कारण सांगितले ज्यामुळे पोलिसही हैराण झाले. पुंछ येथील रहिवासी हकीमदीन यांच्या डोक्याला मार लागला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथील एका रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकाला देखील पुंछला जायचे होते. खोटे मृत्यूप्रमाणपत्र तयार करून मृतदेह पुंछला घेऊन जाण्याची त्यांनी योजना आखली. रुग्णवाहिका चालकाने हकीमद्दीनला त्याचे मृत्यू प्रमाणपत्र बनवायला सांगितले आणि अशा परिस्थितीत त्याचा मृतदेह घेऊन पुंछला सोडून येईल.
यासाठी हकीमद्दीन, चालक आणि इतर तीन लोकांनी मृत्यूप्रमाणपत्र तयार केले. या सर्वांना पुंछला जायचे होते. जिवंत हकीमद्दीनला रुग्णवाहिकेत ठेवून पुंछच्या दिशेने निघाले. 200 किलोमीटरपर्यंत या लोकांनी सर्व चेकपॉईंट्स पार केले. मात्र गावाच्या अलिकडे असलेल्या अखेरच्या चेक पोस्टवर एका पोलिस कर्मचाऱ्याला त्यांच्यावर संशय आला. चादर ओढून झोपलेला माणून जिवंत असल्याचे त्याला समजले. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण सत्य समोर आले. या सर्वांवर फसवणूक आणि सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.